गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बीबीटोला येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर मादी बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वन विभागाकडून मादी बिबट्याचे शोध सुरू होता, आता या मादी बिबट्याला दोन छाव्यांसह जेरबंद केले आहे.