दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समता सैनिक दल, विद्यार्थी, पालक वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुद्ध विहार येथून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.