गोंदिया जिल्ह्यातील उन्हाच्या पारा 40 पास झालेला आहे आणि या उन्हाच्या तडाका आता सामान्य नागरिकांबरोबर जनावरांनाही बसत आहेत. जंगलात राहणारे माकड आता पाण्याच्या शोधामध्ये लोकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचले आहे. नागरिकांनी स्वतःच्या वापरासाठी ठेवलेल्या पाण्याचा उपयोग आपली तहान भागवण्याची साठी माकड करत असल्याचे समोर आले आहे.