गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना (उबाठा) शाखा नवेगाव बांध यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले उपस्थितांनी महाराजांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.