गोंदिया येथे शासनाच्या शिवभोजन योजनेचे अनुदान मागील दहा महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे दोन शिवभोजन केंद्रे बंद पडली असून, गरजूंचे जेवण थांबले आहे. केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनुदानाच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.