गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून पारा 8.4 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार वाढले आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना त्रास होत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस थंडी वाढण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना उबदार कपडे घालण्यासह योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.