बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बच्चेकंपनीसह मोठ्या लोकांची आकर्षित असलेली वनराणी मिनी टॉय ट्रेन ही ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती. यानंतर ४ वर्षांपासून ती सुरु होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता तिचे काम पुर्ण झाले असून तिचे प्रात्यक्षिक झाले आहे. यामुळे ती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.