बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील कोमल खनपटे हिने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची झलक दाखवत अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या 10 सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अचूकपणे सांगत कोमलने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोमलच्या या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तिचे कौतुक होत असून तिला आता गुगल गर्ल म्हणून ओळख मिळत आहे.