सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह शेकडो समर्थकांना घेऊन बैलगाडी रॅली काढत बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.