दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबर रोजी परळी येथील गोपीनाथ गडावर जयंती साधेपणाने साजरी होणार आहे. पंकजा मुंडेंनी अनुयायांना जिथे आहात तिथे जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. गडावर रक्तदान शिबिर, भजन-कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन आहे. सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे कुटुंबियांसह अभिवादन करणार असून, अनेक राज्यांतून कार्यकर्ते उपस्थित राहतील.