परभणी जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात झाली असून शेतशिवारात हरभरा कापणी काढणीची लगबग सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काढणीच्या मजुरी दरात एकरी 1 हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली झाल्याने उत्पादन खर्च वाढलाय, हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता असली तरी हरभर्याला भाव ही वाढून मिळण्याची मागणी शेतकरी करत आहेत.