इचलकरंजी शहरातील नारायण नगर गणेशोत्सव मंडळ, गोंधळी समाज यांच्या गणेशमूर्तीचा भव्य आगमन सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडला. यंदा मंडळाच्या वतीने शहरात प्रथमच गोंधळी समाजाच्या रूपातील गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार सतीश उर्फ भैय्या कुंभार यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली असून, मुंबईच्या आर.के. आर्ट्सकडून मूर्तीची सजावट करण्यात आली आहे. आगमन मिरवणुकीत रेणके बंधूंचा गोंधळ आणि गोल पथक विशेष आकर्षण ठरले.