ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धनाचा ध्यास घेत 'राजा शिवछत्रपती परिवार' यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले परांडा येथे नुकतीच एक भव्य स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांमधून 2000 हून अधिक शिवप्रेमी मावळे या गडावर एकत्र आले होते.