शीख धर्माचे नववे गुरु श्रीगुरु तेग बहादूर साहब यांच्या 350 व्या शहिदी समागम दिनानिमित्त नांदेड शहरात ऐतिहासिक 'हिंद दी चादर' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या वतीने 24 आणि 25 जानेवारी रोजी हा कार्यक्रम नांदेड शहरात पार पडणार आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय.