भंडाऱ्याच्या पवनी तालुक्याचे भूमिपुत्र वीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर हे पाकिस्तानी भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या आठव्या गौरवशाली बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तसेच युवक व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने व्यापारी संघ, पवनी यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान परिसरातील युवा तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य व नागरीक सहभागी झाले होते.