बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज जगदगुरु संत तुकाराम महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामधे अग्रभागी श्वेत अश्व ,फेटे परिधान केलेले संत मंडळी, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा आणि पादुका असलेला रथ ,संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे अशी वेशभूषा असलेला रथ आकर्षण ठरला. विशेष म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळेस पालखीची नगरपरिक्रमा करण्यात आली.