जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर करमाळा तालुक्यातील वरकटणे गावचे सुपुत्र प्रवीण तनपुरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत असून, वरकटणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे.