पनवेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी युवा पिढीने “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश अंगीकारावा, असे आवाहन करण्यात आले.