स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडारा शहरात देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शहरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता