दीर्घ सुट्टीनंतर आजपासून नाशिक शहर आणि परिसरातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस सुखद आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी नाशिकमधील विविध शाळांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.