औषधात भेसळ असल्यामुळेच द्राक्ष बागा जळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. हातातोंडाशी आलेलं द्राक्ष पीक जळू लागल्याने लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं होऊ लागले असून औषधाच्या कंपन्यावर कारवाई करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.