सोलापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊसाचा उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी इथले शेतकरी अंकुश सिरसाट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. त्यांचं जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी या गावांतील शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आहे.