धाराशीवच्या तुळजापूर मध्ये लग्नाच्या आधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. परण्यावरती चाललेला नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर पोहोचला. संकेत भोजने असे या तरुणाच नाव आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे.