नांदेडच्या कंधार तालुक्यातील शिर्षी बुद्रुक गावामध्ये मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे पीक घेतले जाते. भुईमुगाच्या उत्पन्नासाठी येथील जमीन चांगली मानली जाते, मात्र यंदा भुईमुगाच्या पिकाला बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला असून, शेतकरी संकटात सापडला आहे.