परळी तालुक्यातील नंदागौळ येथील शेतकरी सोपान गीते यांनी आपल्या अर्धा एकर शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली होती. सध्या त्यांच्या शेतात भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. या पिकासाठी आतापर्यंत त्यांना अंदाजे आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च आला असून त्यातून त्यांना 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.