दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धरणगाव तसेच जळगाव तालुक्यात काही गावांमध्ये अक्षरशः गहू ज्वारी मका ही पीक जमीनदोस्त झाली आहेत. पिकांच्या नुकसानीच्या पाण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धडकले व नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात करण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात जवळपास तीन हजार हेक्टर तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सहा हजार हेक्टर एवढ्या नुकसान झाल्याची माहिती देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.