महापालिका निवडणुकीच्या धामधूमीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय बैठक मांडत हुरडा पार्टीला हजेरी लावली. कार्यकर्त्याने केलेल्या आग्रहाला मान देत सिनाई ऍग्रो टुरिझम सेंटरला भेट देत हुरडा पार्टीत सहभाग नोंदवला. ग्रामीण संस्कृती, शेतीप्रधान जीवनशैली व पारंपरिक खाद्यपरंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते.