जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे राज्यस्तरीय अभियान सुरू करण्यात आलं आहे याचा शुभारंभ राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील गरदरेवाडी जिल्हा परिषद शाळेतून करण्यात आला आहे. यावेळी आमदार राहूल कुल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांसह विविध मंडळी उपस्थित होती.