नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाला अनोखे स्वरूप पाहायला मिळत असून, सार्वजनिक गणेश मंडळांकडून दरवर्षी विविध आकर्षक देखावे साकारले जातात. यंदा नंदुरबारच्या प्रसिद्ध संत कबीरदास व्यायामशाळा आणि संत कबीरदास न्यू व्यायामशाळेच्या वतीने महादेवाच्या प्रसिद्ध बद्रीनाथ आणि जगन्नाथ मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येत आहे.