गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला दान देण्याची परंपरा आहे. शिर्डीच्या साईबाबांना गुरू मानणारे लाखो साईभक्त आज शिर्डीत दर्शनाला दाखल झाले असून आपल्या शक्तीनुसार बाबांच्या झोळीत दान टाकत आहेत. आंध्रप्रदेश येथील साईभक्ताने 566 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षीकाम केलेला सोन्याचा मुकूट साईबाबांना अर्पण केलाय तर महाराष्ट्रातील एका तीन लाख रूपयांचे सोन्याचे फुल आणि चांदीचा हारही साईबाबांना भक्तांकडून अर्पण करण्यात आला आहे.