गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सर्व धर्म समभाव प्रतीक व ३५३ वर्षाची जुनी परंपरा असलेला हजरत वली हैदर शाह बाबा उर्स जत्रेला तीन राज्यातून आलेले भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. महाराष्ट्र तेलंगाना छत्तीसगड तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेत भाविक मुक्काम करून दर्शन घेत असतात. ३५३ वर्षापासून असलेली ही जुनी परंपरा सर्व धर्म समभावाच्या प्रतीक म्हणून ओळखली जाते.