जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बहाळ शिवारात सर्वाधिक फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे शेवगा व आंब्याच्या बागा अक्षरशः उन्मळून पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.