भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या मागील भागात एका बोलेरो पिकअप गाडीचे नियंत्रण सुटल्याने ती थेट नाल्याच्या काठावर असलेल्या विहिरीत कोसळली. गाडी विहिरीचे कठडे तोडून अर्धी आत आणि अर्धी बाहेर अशा अत्यंत धोकादायक स्थितीत लटकून राहिली. अपघात होताच चालक आणि क्लीनर यांनी वेळ न गमावता गाडीतून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले.