इंग्लंडच्या हना लोक्सने 'प्रोजेक्ट सॉल्ट रण' अंतर्गत गरिब, अनाथ व वृद्धांसाठी भारतभर धावण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ४०३० किमीच्या या प्रवासातील २४०० किमीचा टप्पा तिने वाशीम जिल्ह्यातील वाकद येथे पूर्ण केला. सध्या ती रिसोड-मेहकर मार्गावर धावत असून, सुमारे ३८ दिवसांत तिचा प्रवास बांगलादेश सीमेवर संपेल. हा तिचा सेवाभावी प्रवास प्रेरणादायी आहे.