इराण युद्धामुळे जागतिक इंधन बाजारात निर्माण झालेल्या संभाव्य परिस्थितीमध्ये भारताची इंधन सुरक्षा चर्चेत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली आहे की, भारताकडे सध्या आठ आठवड्यांसाठी पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.