हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर ना खाऊंगा, ना खाने दुंगा भूमिका सोडून तुम भी खाओ, हम भी खाऐंगे हे धोरण स्वीकारल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तो मी नव्हेच नाटकातील लखोबा लोखंडेप्रमाणे वागत असून, सरकार सध्याच्या वादांवर पडदा टाकण्यासाठी नवा वाद निर्माण करत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.