हरतालिका तृतीया सणानिमित्त ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील पार्वतीमातेच्या पुजनासाठी महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. या दिवशी महिलावर्ग उपवास करून माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करतात. अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि समृद्धीसाठी या उपवासाला विशेष महत्त्व आहे. हरतालिकाच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात, तर अविवाहित मुली योग्य वर मिळावा यासाठी उपवास पाळतात. या सणादिवशी गौरी-शंकराच्या मूर्तीची स्थापना करून अखंड दीप प्रज्वलित केला जातो. परळीत हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आजच्या या दिवशी ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे असलेल्या पार्वतीमातेची पुजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.