हातकणंगळे येथे उमेदवारी अर्ज भरण्यास मुदत संपल्याचे कारण देत अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने इच्छुक उमेदवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या केंद्राबाहेर आंदोलन केले. तहसीलदारांच्या निर्णयावर उमेदवार नाराज असून, निवडणूक आयोगावर हुकूमशाहीचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.