भंडारा जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच रेझिंग डेच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ऑटो रिक्षा चालक, पोलीस विभागातील वाहनचालक तसेच सर्व वाहतूक अमलदार यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.