पॉलिसीबझारच्या अहवालानुसार, ८३% भारतीयांना आरोग्य विम्याचे महत्त्व माहीत असले तरी, केवळ १९% लोकच तो खरेदी करतात. यापैकी ४८% लोक ५ लाखांपर्यंतचा विमा घेतात, जो वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी अपुरा आहे. कर्करोगापासून डेंग्यूपर्यंतच्या आजारांसाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबासाठी पुरेसे विमा संरक्षण घेण्याचा विचार करा.