लोणचे जेवणाची चव वाढवते, परंतु त्याचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यात असलेले जास्त मीठ, तेल आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार आणि किडनी व हृदयावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे लोणचे मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक आहे. काही विशिष्ट लोकांनी तर ते पूर्णपणे टाळायला हवे.