छातीत दुखणे, डाव्या हाताला वेदना, अचानक थकवा आणि धाप लागणे ही हृदयविकाराची गंभीर लक्षणे असू शकतात. काम न करताही लवकर थकवा येत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे. नियमित 30 मिनिटे चालणे, बीपी व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आणि धूम्रपान सोडणे हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी सोपे उपाय आहेत.