अहिल्यानगर वन विभागाकडून जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन महिन्यात 58 हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. यातील बहुतांश बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र अजूनही काही बिबटे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वनविभागाच्या नर्सरीत ठेवण्यात आले आहे. मात्र बिबट्यांना ज्या पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आले आहे, ते पिंजरे उन्हामुळे तापत असल्यानं त्यांना उष्णतेचा त्रास होत आहे.