वाशिम जिल्ह्यात सध्या उन्हाचा तीव्र कहर सुरू असून गेल्या महिन्यापासून तापमानाने चाळीशी पार केली आहे. कालही जिल्ह्यात ४३ पूर्णांक २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आज हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दुपारच्या वेळेत वाशिम शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.