वर्धा जिल्ह्यातउष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान 43.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना गुरुवारी 16 एप्रिल रोजी एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी ही घोषणा केली आहे.