रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नारळ पाण्याला पसंती दिली असून, ठिकठिकाणच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.