विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून गोंदिया जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे... गोंदिया जिल्ह्याचे तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.