जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर झाला आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगावात तापमान 44 अंशांवर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भरदुपारचे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तापमान वाढीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असून आरोग्य विभागाने काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.