सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायती बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातारा नगरपालिकेच्या ईव्हीएम मशीन एमआयडीसी येथील एका गोदाममध्ये ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन असणाऱ्या स्ट्रॉंग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरासह पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक स्ट्रॉंग रूमला 8 तासानंतर प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे.