निसर्गाची अद्भुत देणगी लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून आहे. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरण जवळपास 30% भरले आहे. या दमदार पावसामुळे परिसरातील भात पिकास दिलासा मिळणार असू संपूर्ण परिसराने आता हिरवा शालू पांघरलाय..परिसरातील वसुंधरा फॉल ,कोळटेंंभे फॉल ,नेकलेस फॉल , रिव्हर्स फॉल्स , यासह ओढे, नाले, धबधबे खळखळून वाहत आहेत. छोटे-छोटे बंधारे भरले असून संपूर्ण परिसरच हिरवाईने नटलाय...येथील निसर्गाचे हे अद्भुत सौंदर्य बघण्यायासाठी पर्यटकांची पावले आता भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत..